---Advertisement---

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास १० वर्षेची सक्तमजूरी

by team
---Advertisement---

भुसावळ :  शहरातील एका अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेले होते. तसेच तिच्यावर वारंवार अत्याचार केला होता. याबाबत मुलीच्या आईने बाजारपेठ पोलिसांत २०१५ साली तक्रार दिली होती. तक्रारीनुसार न्यायालयाने केलेल्या चौकशीत आरोपी दोषी आढळून आला असता बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे दिनांक ८ रोजी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

भुसावळच्या एका परिसरातील अल्पवयीन मुलीला २८ मे २०१५ रोजी फुस लावून पळवून नेले होते. याबाबत पीडित मुलीच्या आईने २९ मे २०१५ ला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गौतम शिवचरण चौव्हाण याच्याविरूध्द तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार संशयित आरोपी गौतम विरूद्ध बाललैगिंक अत्याचार कायदा कलम (३ अ) व (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


आरोपीने पीडित मुलीला धमक्या दिलेल्या असल्याने जेव्हा ती तिच्या आई वडिलांना भेटली तेव्हा पिडीताने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत त्यांना काहीच सांगितले नाही. परंतु , थोड्या कालावधीनंतर पीडित मुलीची भिती निघून गेली. या नंतर तिने गौतमने तिला त्याच्या नातेवाईक असलेल्या इतर लोकांकडे वेगवेगळ्या गावी नेवून अत्त्याचार केल्याचे सांगितले. तर इतरांनी ही गौतम यास सहकार्य केल्याचा आरोप केला. या प्रकरणात गौतम याच्याविरुद्ध भुसावळ येथील विशेष न्यायाधिश डि. एल. गायकवाड यांच्या न्यायालयात या खटल्याचे सरकारतर्फे पीडितेची आई तसेच पीडितेची तपासणी करणाऱ्या डॉ. नम्रता अच्छा तर जन्म नोंदणी अधिकारी व तपासी अधिकारी पीएसआय आशिष शेळके आदींसह ९ लोकांच्या साक्षी तपासण्यात आल्यात.

साक्षी, पुराव्याअंती आरोपी गौतमविरूध्द अत्याचाराचा आरोप सिध्द झाल्याने न्यायालयाने त्यास दोषी धरून ८ रोजी १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. (केसीएन)गौतम यास ठोठावलेल्या शिक्षेत ५ हजार रुपये दंड व दंडापैकी ४ हजार रूपये पीडितेला देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. तर उर्वरित सहकार्य करणारे आरोपींविरूध्द दोष सिध्द न झाल्याने त्यांना दोषमुक्त करण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. विजय खडसे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय रफिक शेख कालू यांनी सहकार्य केले. या गुन्हयाचा तपास पीएसआय आशिष शेळके यांनी केला होता.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment