Crime News : आमिष देत तरुणाला लुटले, अखेर दोघे गजाआड

धुळे : साक्री तालुक्यात सुझलॉन कंपनीमध्ये गुंवणूकीच्या नावाखाली लूट करण्याचे प्रकार उघड होत आहे. सुझलॉन कंपनीचे नावाखाली स्वस्त दरात कॉपर केबल वायर,सोने चांदी,नाणे, कंपनीत गुतवणुक करुन अवघ्या काही दिवसात पैसे डबल करण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. अशाच प्रकारे ३० हजार रुपयांची गुंवणूक करण्याचे आमिष दाखवत एकास मारहाण करण्यात आली आहे. निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत हा मारहाणीचा प्रकार घडला आहे.

सोहेल उमेदखान पठाण (वय २५  रा.खुंटेपाडा ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांच्याकडून सुझलॉन कंपनीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ३० हजार रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल असे त्यांना काठीने मारहाण करुन तसेच चाकुचा धाक दाखवुन जामदा गाव शिवारात लुटले. त्यांच्या फिर्यादीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गंभीर स्वरूपाचा प्रकार घडल्यानंतर निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी मयुर एस. भामरे, सहा पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ एका पथक बनविले. या पथकात निजामपुर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस उप-निरीक्षक प्रदीप पंडीत सोनवणे, पोलीस उप-निरीक्षक मधुकर एल.सोमासे, पोलीस उप-निरीक्षक यशवंत आर. भामरे, पोकॉ जयवंत राजेंद्र वाघ पोहेकॉ माळचे,  पोकॉ सागर थाटशिंगारे, पोहेको नागेश सोनवणे, पोकॉ प्रवीण दामु पवार,  यांचा समावेश करण्यात आला आहे.

गुन्हयातील आरोपी सचिन चक्कर चव्हाण, मगन बच्चन चव्हाण दोन्ही रा.जामदा ता.साक्री जि.धुळे यांना पथकाने गुन्हा घडल्याचा 24 तासाच्या आत अटक केली. तसेच त्यांना तीन दिवसाच्या पोलीस कोठडी दरम्यान त्यांचे कडुन मोबाईल व इतर मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करुन त्यांचे इतर साथीदारांचा तपास सुरु आहे.

सदरची कारवाई श्रीकांत धिवरे,पोलीस अधीक्षक, धुळे, किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षकधुळे, एस.आर.बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी साक्री यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि मयुर भामरे,पोउनि प्रदिप सोनवणे,पोउनि मधुकर सोमासे,पोउनि यशवंत आर.भामरे,पोहेकॉ माळचे, पोहेकॉ नागेश सोनवणे,पोकॉ सागर थाटशिंगारे यांचे पथकाने केली आहे.