Crime News: पंचगणीतील डान्स बारवर छापा, अश्लील नृत्य करणाऱ्या बार गर्ल्ससह २१ जण ताब्यात

Crime News: महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांचगणीजवळील एका हॉटेलमध्ये महिला अश्लील नृत्य करत होत्या. याप्रकरणी २१ जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी दिली आहे. यात गायक आणि वेटर म्हणून लहान कपडे घातलेल्या १२ महिलांनी २० ग्राहकांसमोर अश्लील नृत्य केले?, हॉटेल हिराबागच्या मालकासह २१ जणांना अटक, २५ लाख रुपयांचे मोबाईल फोन आणि कार जप्त करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील भिलार येथे भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार रूममध्ये अश्लील नृत्य प्रतिबंध आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण कायदा, २०१६ तसेच महाराष्ट्र लैंगिक गुन्हे प्रतिबंध कायद्याअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.

सातारा पोलिसांनी  दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, हॉटेलमध्ये महिला ‘बार डान्सर’ म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर हॉटेल हिराबाग येथे मंगळवारी छापा टाकण्यात आला. यावेळी जवळपास १२ महिला गायक आणि वेटर म्हणून काम करणाऱ्या आणि छोटे कपडे घालून सुमारे २० ग्राहकांसमोर अश्लील नृत्य सादर करत होत्या.

या छाप्यात २५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची वाद्ये, मोबाईल फोन आणि एक कार जप्त करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या महिलांना कुठून आणण्यात आले याचा तपास पोलिस करत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की समुपदेशनानंतर महिलांना त्यांच्या परिवाराला सुपूर्द केले जाणार आहे.