---Advertisement---

Crime News: शिंगाडे डोक्यात टाकून तरुणाचा खून; विरवाडे येथील घटना

by team
---Advertisement---

चोपडा : मित्राची बदनामी केल्याच्या संशयातून लाकडी दांडका टाकून तरुणाचा खून केला. दादा बारकू ठाकूर (३१, विरवाडे, ता. चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवार २७ डिसेंबर रोजी हिरम बाबा ठिकाणाजवळ घडली. या प्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

रजूबाई बारकू ठाकूर (५४, विरवाडे) यांच्या तक्रारीनुसार, संशयित दिनेश मधुकर कोळी यांच्या काकाकडे दादा ठाकूर याने दिनेश हा मित्रांसोबत दारू पार्त्या करतो व असे बोलल्याचा संशय होता. त्यावरून शुक्रवारी सायंकाळी तिघा संशयितांनी बहिरम बाबा ठिकाणाजवळ दादाच्या डोक्यात शिंगाड्याने (लाकडी दांडका) मारहाण केली. त्यात दादा ठाकूर गंभीर जखमी झाला व त्यास जळगावच्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये हलवल्यानंतर शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू ओढवला.

यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा

दिनेश मधुकर कोळी (विरवाडे), पिंटू उर्फ अरुण गोविंदा कोळी, शरद संतोष कोळी (सर्व रा. विरवाडे, ता. चोपडा) यांच्याविरुद्ध चोपडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तपास करीत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment