---Advertisement---

Jalgaon Crime News : धुळे येथील गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

by team
---Advertisement---

जळगाव : गेल्या महिन्यात रामानंदनगरात एका ज्येष्ठ महिलेचे कुलूपबंद घर फोडून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली होती. या चोरीमध्ये २३७ ग्रॅम सोने, ४०० ग्रॅम चांदी, रोख १६ हजार ५०० असा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात एलसीबीच्या पथकाने तपासचक्रे गतीने फिरवून रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल प्रवीण झाल्टे उर्फ साहिल शेख (रा. पवननगर, धुळे) याला ताब्यात घेतले. पथकाने सलग दोन दिवस धुळे येथे थांबून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या.

ज्येष्ठ महिला वनिता जगन्नाथ चौधरी यांच्याकडे ही चोरी झाली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. ही चोरी धुळे येथील सराईत गुन्हेगार साहिल प्रवीण उर्फ साहिल शेख याने केल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक रवाना केले होते.

गुरुवार, २८ रोजी पथकाने त्याला पवननगर धुळे येथून ताब्यात घेतले. त्याने या गुन्ह्याची पथकाला कबुली दिली. साहिल याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एलसीबी वरिष्ठ पो. नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात पथकातील पो. उप. निरीक्षक दत्तात्रय पोटे, सहा. फौजदार रवी नरवाडे, विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, अतुल वंजारी, पो.हे.कॉ. विजय पाटील, हरीलाल पाटील, राजेंद्र मेढे, पो. कॉ. प्रदीप चवरे, अक्रम शेख, ईश्वर पाटील यांनी ही कारवाई केली. साहिल याला रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपास पो.उप. निरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment