महानगरपालिकेच्या लिफ्ट मध्ये गर्दी…. आणि लिफ्ट कोसळली; अनेकांची मृत्यूच्या दारातून सुटका !

---Advertisement---

 

मालेगावमधील आजचा दिवस महापौर निवडीमुळे चर्चेत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी इस्लामच्या नसरीन बानो शेख यांची निवड झाल्यानंतर मनपा सभागृहात मोठा गोंधळ उडाला.

महापौर निवडीनंतर शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नगरसेवक, कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधी एकत्र आले होते. याचवेळी मनपा सभागृहातील लिफ्टमध्ये प्रचंड गर्दी झाली. लिफ्ट ओव्हरलोड झाल्याने ती अर्धवट अडकली, तर काही क्षणातच लिफ्ट कोसळल्याची घटना घडली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला लिफ्टचा दरवाजा बंद होत नव्हता. त्यानंतर लिफ्टमधून दोन वेळा विचित्र आवाज आला. लिफ्टच्या ताराही जीर्ण अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. याच लिफ्टमध्ये सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते आणि पत्रकार अडकले होते.

या घटनेत काही नगरसेवक आणि पत्रकारांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
लिफ्ट जर पूर्णपणे आदळली असती तर गंभीर अपघात किंवा स्फोटाचीही शक्यता होती, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मनपा प्रशासनाच्या देखभाल दुरुस्तीच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केला जात असून या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---