---Advertisement---

Cyber Crime : जिल्ह्यात सायबर ठगाचा धुमाकूळ ! ५ महिन्यांत १२ गुन्हे, तब्बल दोन कोटी ८८ लाखांचा गंडा

---Advertisement---

Cyber Crime : ऑनलाइन पद्धतीने दरोडा टाकून सायबर ठगांनी पाच म हिन्यांत जळगावसह जिल्ह्यात १२ तक्रारींत सुमारे पावणे तीन कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. सायबर पोलीस ठाण्यात यासंदर्भात १२ गुन्हे दाखल झाले असून, ग्राहकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

गुन्हेगारी जगतात आज सायबर गुन्हेगार रकमांची लूट करण्यात अव्वल स्थानी आहेत. या गुन्हेगारांची विश्वात साखळी कार्यरत असल्याने त्यांचे नेटवर्क जबरदस्त व्यापले आहे. सायबर ठग वेगवेगळ्या पद्धती वापरून ग्राहकांना गळाला लावतात. कधी अधिक नफ्याचे आमिष, तर कधी बनावट पोलिसिंग करून तपासाचा बहाणा करीत ग्राहकांना ऑनलाइन कस्टडी किंवा नजरकैद करतात. अनोळखी मोबाइल क्रमांकांवरून आलेले कॉल अथवा लिंक ओपन करू नये किंवा कॉल उचलू नये, असे वारंवार सायबर पोलिसांतर्फे नागरिकांना सजग करण्यात येत असते.

केंद्र सरकारच्या गृह विभागाकडूनही सायबर गुन्ह्यांसंदर्भात वेळोवेळी योग्य त्या सूचनांद्वारे सायबर गुन्हेगारांबाबत नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र, त्यानंतरही आर्थिक फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत असून, बँक खात्यातील लाखो रुपयांना ऑनलाइन गंडा घातला जात आहे. जळगाव जिल्ह्यात १ जानेवारी २०२५ ते ९ मे २०२५ या पाच महिन्यांत ऑनलाइन फसवणूक करून लाखो रुपयांना गंडा घातल्याचे १२ गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. यातून तब्बल दोन कोटी ८८ लाख १९ हजार ९७५ रुपये ठगांनी तांबविले आहेत.

असा लावलाय चुना

चालू वर्षात जिल्ह्यात सायबर ठगांनी मोठमोठ्या रकमांवर ऑनलाइन डल्ला मारला आहे. हे आकडे थक्क करणारे आणि तक्रारदाराचे बैंक खाते झटक्यात रिकामे करणारे आहेत. एका ग्राहकाच्या खात्यातून तब्बल ७८ कोटी ९० हजार ५०० रुपये, तर दुसऱ्या एका ग्राहकाला ७१ लाख ९२ हजार १९२ रुपयांचा गंडा घातला आहे. याशिवाय, ३४ लाख ६३ हजार १०० रुपये, ३१ लाख ५६ हजार ६४ रुपये, १४ लाख ६३ हजार ५२५ रुपये, १३ लाख ४७हजार ८१ रुपये, ९ लाख ८६ हजार ९५ रुपये, ९ लाख १२ हजार ११४ रुपये, ७ लाख ३० हजार रुपये, ६ लाख १७ हजार रुपये, ५ लाख ३२ हजार ६८८ रुपये, ५ लाख २९ हजार ६१६ रुपये, असा तब्बल दोन कोटी ८८ लाख १९ हजार ९७५ रुपयांची सायबर ठगांनी जळगाव जिल्ह्यातून ऑनलाइन लूट केली आहे.

फायद्याचे आमिष फसवेच

गुंतवणूक करून झटपट भरपूर नफा मिळवा, असे सांगणाऱ्यांना कोणीच ओळखत नसते. मात्र, ते दाखवीत असलेल्या आमिषावर विश्वास ठेवून त्यांच्या मोहात अडकून ग्राहक पैशांची गुंतवणूक करतात. शेकडो, हजार नव्हे तर लाखो रुपये गुंतवणुकीत टाकतात. मात्र, त्यांना नफा तर मिळत नाहीच, मूळ रक्कमही ते गमावून बसतात. गुंतवणुकीतून नफा मिळवून देण्याचे दावे करणारे हे फसवे असतात. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. अनोळखी क्रमांकावरून दिली जाणारी माहिती, लिंक यावरही विश्वास ठेवू नये. असे कॉल न घेणे हे सुरक्षित ठरू शकेल. आमिष दाखविणारे हे अनोळखीच असतात. त्याची दखल कोणीही घेऊ नये किंवा त्यांना प्रतिसादही देऊ नये. आपल्या बँकेची, आपली स्वतःची कोणतीही माहिती त्यांना देऊ नका. पैसे गुंतवणुकीत नफा कम विण्याचा दावा करणारे कॉल हे फसवे असतात. ग्राहकांनी नेहमी सजग राहावे. अधिक माहितीसाठी सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
– सतीश गोराडे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, जळगाव

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment