जळगावातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन, रस्ते त्वरित पूर्ण करण्याची मागणी

जळगाव : शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीअंतर्गंत शहरातील काही ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम आणि मुरूम टाकल्यानंतरही काम सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या समस्येवर कांचन नगरमधील माजी नगरसेविका आणि नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेऊन त्वरित रस्ता तयार करण्याची मागणी केली. तसेच याबाबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे .

जळगाव शहरासाठी तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना शंभर कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीच्या माध्यमानातून शहरातील विविध प्रभागात रस्त्यांची आखणी करण्यात येऊन मंजुरी देत टेंडरिंग करण्यात आले आहे.

अशाच प्रभाग क्रमांक 2 अ रस्त्याचे काम सुरू करण्यात आले त्या ठिकाणी खोदकाम करून मुरमुही टाकण्यात आला मात्र गेल्या एक-दीड वर्षापासून कोणत्याही प्रकारचे काम झाले नाही अशी नागरिकांनी ओरड केली. त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेतली व काम काम होत नाहीये या प्रभागातील रस्ते तयार करण्यात का येत नाहीये याबाबत विचारणा केली.

याबाबत अपर जिल्हाधिकारी यांना कांचन नगर मधील नागरिकांनी निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी या रस्त्याचे कामकाज पंधरा दिवसात सुरू करावे असेही त्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे यांनी नागरिकांची समजूत काढत नागरिकांना सांगितले आहे की, त्या रस्त्याचे काम करण्याचा कालावधी दोन वर्षांचा आहे. आमच्या वर खूप प्रेशर आहे व ठेकेदारांचे 17 ते 18 कोटी रुपये बिल बाकी आहे. त्यामुळे त्यांना ते बिल मिळणार की नाही मिळणार म्हणून अनेक ठेकेदारांनी कामे बंद केले की त्यांनी नागरिकांना सांगितले मात्र याबाबत संबंधित ठेकेदाराला फोन करून त्यांनी त्या तिथेच जाऊन व संबंधित माझे नगरसेविकांसमोर ते कामाची पाहणी करून काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.