जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीची मागणी

---Advertisement---

 

जळगाव : हरिविठ्ठलनगर, बाजारपेठ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला दिनांक ११ जून २०२५ रोजी रात्री आलेल्या जोरदार वादळ-वाऱ्याचा फटका बसला. या वादळामुळे स्मारकावरील पत्र्याचे शेड उडून जाऊन मोठे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर सध्या स्मारक उघड्यावर आले असून भविष्यात पुतळ्याची विटंबना किंवा अधिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता मजबूत व टिकाऊ स्वरूपाचे नव्याने आरसीसी बांधकाम करून स्मारक उभारण्यात यावे, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे.

या मागणीसाठी हरिविठ्ठलनगर परिसरातील नागरिकांनी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौर दीपमाला काळे यांना निवेदन सादर केले. संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्मारकाचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

निवेदन देताना माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, फुले-शाहू-आंबेडकर महापुरुष सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश झिने, विद्या झनके, शोभा इंगळे, प्रमिला इंगळे, चंद्रमणी सोनवणे, पूजा इंगळे, कांताबाई झिने, शोभा पाटोळे, प्रशांत इंगळे, आकाश तायडे, आकाश सपकाळे, छाया इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---