मानपुर महार वतन जमीन बनावट प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी –अनिल अडकमोल

---Advertisement---

 

मानपुर येथील महार वतन जमिनीच्या बनावट व्यवहार प्रकरणाला नवे वळण लागले असून या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी,आणि आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पत्रकार परिषदेत केली.


दि. 31 मार्च 2026 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मानपुर ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथील रहिवासी चमेलीबाई तुकाराम तायडे यांच्या मालकीची महार वतन जमीन 2002 साली खरेदी करण्यात आली होती. मात्र ही जमीन माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुली शारदा खडसे यांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या प्रकरणात अद्याप कोणतेही कारखाना उभारणीचे काम झाले नसून मूळ मालकांना जमीन परत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच बोडवड पोलीस स्टेशन येथे खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अडकमोल यांनी केली.


या प्रकरणात एकनाथ खडसे व त्यांच्या मुलीच्या नावावर अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच 2002 साली संबंधित व्यवहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.


दरम्यान, राज्य विधानसभेतही या विषयावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सदर जमीन महार वतन असल्याचे स्पष्ट केल्याचेही अडकमोल यांनी सांगितले.


या पत्रकार परिषदेला तक्रारदार चमेलीबाई तायडे यांच्यासह अशोक तायडे, संतोष तायडे, उत्तम तायडे, सौरभ तायडे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---