पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाळेत शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक


जळगाव : महापालिकेतर्फे एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे ज्याअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत खास कलाशिक्षक शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मूर्ती बनवण्याचे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रात्यक्षिका दरम्यान विद्यार्थ्यांना शाडू मातीचा वापर करून आपापल्या हस्तकौशल्याने मूर्ती बनवण्याची संधी दिली जाणार आहे.

---Advertisement---

 

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी स्वतः तयार केलेली मूर्ती आपल्या घरी नेऊन गणेशोत्सव साजरा करतील. या उपक्रमाचा उद्देश फक्त सर्जनशीलता वाढवणे नसून, पर्यावरणास अनुकूल सण साजरे करण्याची संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हाही आहे. शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्ती जलप्रदूषण न करता सहजपणे नष्ट होतात, हे लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थी केवळ एक कला आत्मसात करणार नाहीत, तर पर्यावरण संवर्धनासाठी सजग नागरिक म्हणूनही घडतील. या मूर्तीचे वैशिट्य म्हणजे घरीच विसर्जन करता येणार आहे.

या उपक्रमासाठी सुनिल दाभाडे 9822017884, शाम कुमावत – 9158/96393, अरुण सपकाळे-9403846646, निलेश चौधरी – 94207874849, दिनेश सानेवणे – 9960222570 पुनम कोष्टी 9579739700, सतीश चौधरी 9970930893, शेलकर सर – 9764265229, सुनिल दाथाडे 9822017884 या कलाशिक्षणसोबत संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---