---Advertisement---

Jalgaon Crime News : एमपीडीएअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील दोघांवर स्थानबद्धतेची कारवाई

by team
---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यातील दोघांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी (वय २४ रा. सदगुरु नगर, शिरसोली नाका, तांबापूरा जळगाव ता. जि. जळगाव) व निखिल उर्फ भोला सुनिल अजवे (वय २३ वर्ष, रा. लक्ष्मीनगर चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव ) यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. दोघांची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील स्थानबध्द गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी (वय २४ रा. सदगुरु नगर, शिरसोली नाका, तांबापूरा जळगाव) याचे विरुध्द ११ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन (व्हिडीओ पायरेट), वाळु तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करण्यासह विविध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानुसार त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई करावी असा प्रस्ताव एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तयार करुन स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथे ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सादर केला. या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २९ नोव्हेंबर २०२४ रोजी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारित केला आहे. यानुसार एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनि शरद बागल, पोउनि. अशोक काळे, पोना योगेश बारी, किशोर पाटील, पोकों छगन तायडे, किरण पाटील अशांनी गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी यास २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ताब्यात घेवून एमपीएडीअंतर्गत करत त्याची मध्यवर्ती कारागृह, नागपूर जि. नागपूर येथे रवानगी करण्यात आली आहे.

चाळीसगावातील एकावरही कारवाई
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील स्थानबध्द निखिल उर्फ भोला सुनिल अजवे (वय २३ वर्ष, रा. लक्ष्मीनगर चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव) याचे विरुध्द भादंवि कायद्याअंतर्गत ९ गुन्हे दाखल आहेत. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी प्रस्ताव तयार करुन स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथे १८ ऑक्टोबर २०२४ रोजी सादर केला. या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. यानुसार २९ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्ताव मंजूर करत निखिल उर्फ भोला सुनिल अजवे याचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर करत नागपूर या कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारित केला आहे. यानुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी, श्रेपोउनि. सुभाष पाटील, पोहेकों योगेश मांडोळे, राहुल सोनवणे, भुपेश वंजारी, पोकों/नरेंद्र चौधरी, समाधान पाटील, राकेश महाजन, पवन पाटील, नितेश पाटील अशांनी स्थानबध्द निखील उर्फ भोला सुनिल अजवे यास २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ताब्यात घेत त्याची मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे रवानगी करण्यात आली आहे.

वरील एमपीडीए प्रस्ताव हे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, , अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग संदिप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव उपविभाग राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरी, बबन आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व त्यांचे अधिनस्त पोहेकों सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकों जयंत भानुदास चौधरी, पोहेकी रफिक शेख कालु, पोहेकों संदिप चव्हाण, पोकों ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment