धुळे महापालिकेमार्फत पाचकंदील भागातील चारही मार्केटचे होणार नुतनीकरण; जुने बांधकाम पाडण्यास सुरवात…!

---Advertisement---

 

धुळे महापालिकेमार्फत पाचकंदील भागातील चारही मार्केटचे नुतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने आज लालबहादूर शास्त्री भाजी मार्केटचे जुने बांधकाम पाडण्यास सुरवात केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, ज्येष्ठ नेते महादेव परदेशी यांच्या प्रयत्नातून शहरातील पाच कंदीलमध्ये असलेल्या चारही मार्केटचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना गाळे व दुकाने खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही व्यापाऱ्यांनी सहकार्य करत आपली दुकाने खाली होती. मात्र, काही जणांनी अद्याप दुकाने खाली केलेली नव्हती. यामुळे पुनर्विकासाच्या कामात बिलंब होत होता. अखेर आज महापालिकेच्या पथकाने लालबहादूर शास्त्री भाजी मार्केटचे पाडकाम करण्यास सुरवात केली.

यावेळी व्यापाऱ्यांनीही दुकाने खाली करत पथकाला सहकार्य केले. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव व त्यांच्या पथकाकडून सदर कारवाई केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---