छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘छावा’ चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील एका दृश्यावरून निर्माण झालेला वाद आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी गेला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असून, यावेळी मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर देखील उपस्थित राहणार आहे.
वादाचा मुळ मुद्दा काय ?
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल एका दृश्यात लेझीम खेळताना दिसतो. या दृश्यावर काही सामाजिक आणि राजकीय संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यांचा दावा आहे की, छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवणे हे ऐतिहासिकदृष्ट्या अयोग्य असून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे आहे.
हेही वाचा : ‘लाडक्या बहीणी’मुळे राज्याच्या तिजोरीवर ताण; काय म्हणतो SBIचा अहवाल ?
सोशल मीडिया प्रतिक्रिया आणि टीका
ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर या दृश्यावरून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. अनेकांनी या दृश्याला इतिहासाविरोधात असल्याचे म्हटले. काहींनी दिग्दर्शकांवर इतिहासाची चुकीची मांडणी केल्याचा आरोप केला.
राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया
वाद वाढल्यानंतर काही राजकीय नेत्यांनी या दृश्याला विरोध करत भूमिका घेतली की, लेझीमचा सीन हटवल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. यामुळे प्रेक्षकांमध्येही मोठी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!
राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची
राज ठाकरे हे कला, चित्रपट, आणि नाट्य यांसाठी आग्रही असल्याने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी थेट शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी मनसेचे चित्रपटविषयक प्रमुख अमेय खोपकर देखील उपस्थित राहणार आहेत. चित्रपटातील वादग्रस्त दृश्य काढण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.
आता राज ठाकरेंच्या भेटीदरम्यान दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर त्यांची काय बाजू मांडतात आणि मनसेकडून कोणती भूमिका घेण्यात येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. .
चित्रपटाविषयी
‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या, रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई भोसलेंच्या आणि अक्षय खन्ना हा औरंगजेबच्या भूमिकेत आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.