दिव्यांग सवलतींचा गैरवापर उघड..! जळगाव जिल्हा परिषदेत बोगस प्रमाणपत्रांचा भांडाफोड फोड, ८ कर्मचाऱ्यांचे निलंबन..

---Advertisement---

 

जळगाव जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत सुरू असलेल्या तपासणी मोहिमेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या तपासणीत गंभीर अनियमितता समोर आली असून, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर केल्याप्रकरणी आतापर्यंत तब्बल ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश, वाचा…. ⬇️

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या तपासणीत दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आली. यामुळे अलीकडेच आणखी चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.
निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील आरोग्य सहायक भालचंद्र नारायण पवार, वाघोड येथील आरोग्य सहायिका छाया घनश्याम भोळे, तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक संदीप विनायक सोनवणे आणि पिंपरखेड आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक गणेश मुरलीधर महाजन यांचा समावेश आहे.

यापूर्वी चार कर्मचाऱ्यांचे झाले होते निलंबन….

यापूर्वीच चार कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असून, नव्या कारवाईमुळे एकूण निलंबितांची संख्या आठवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, अजूनही काही कर्मचारी प्रशासनाच्या रडारवर असून, तपासणीचा फास आणखी घट्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नियमबाह्य प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार…

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या तपासणीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत, नियमबाह्य प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेत सुरू असलेली ही मोहीम भविष्यात आणखी धक्कादायक खुलासे करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---