---Advertisement---

‘वारी’तील शिस्त प्रेरणादायी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

---Advertisement---

जळगाव : वारी ही केवळ पंढरीची वाट नसून, ती अंतर्मनाचा प्रवास असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते चांदसर दिंडी सोहळ्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले, या भूमीला संत व वारकऱ्यांची भूमी म्हणून ओळखले जाते. वारी ही अंतर्मनाचा प्रवास आहे. वारीत समाजाला बांधून ठेवणारे घटक पाहायला मिळतात. जसे शिस्त, सेवा आणि श्रद्धा. कोणताही हुकूम न देता हजारो हात व पावले एकाच तालात चालतात, ही शिस्त प्रेरणादायी असून ती लष्करा इतकी कठोर पण प्रेमळ असल्याचे ना. पाटील म्हणाले.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, मंत्री होण्यापूर्वी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलो असता एका वारकरी आजीने मोठ्या आदराने मंत्री आले मंत्री आले असे म्हणत मार्ग करुन दिला. या घटनेनंतर दोन तासांत मला राज्यमंत्री पद मिळेल असे संकेत मिळू लागले होते. ना. पाटील यांनी सर्व वारकऱ्यांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी आरोग्य, सुख व समृद्धीच्या शुभेच्छा देत पंढरीच्या विठुरायाकडे साकडे घातले. यावेळी त्यांनी माजी आमदार कै. मुरलीधर अण्णा यांच्या आठवणींना उजाळा दिला.

चांदसर येथे श्रीक्षेत्र चांदसर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला. पायी वारी आयोजनाचे हे १९ वे वर्ष आहे. याचे आयोजक श्री दत्त भजनी मंडळ आहे. त्यांच्यासोबतच जेडीसीसी बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, वाय. डी. पाटील, सुनील पवार, आधार कोळी, संजय साळुंखे यांच्या सहकार्याने व सक्रिय सहभागाने सोहळा पार पडला.

यंदाच्या दिंडी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्रीक्षेत्र चांदसर येथून पंढरपूरकडे निघणाऱ्या पायी वारीस शुभेच्छा देत करण्यात आलेली औपचारिक सुरुवात यावर्षीच्या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.

यांची होती प्रमुख उपस्थिती

दिंडी सोहळ्याला स्वामी ब्रह्मानंदजी महाराज, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते पी. सी. आबा पाटील, रा.कॉ.चे योगेश देसले, प्रकाश माळी, जेडीसीसी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर जितेंद्र देशमुख, शेतकी संघाचे गजानन पाटील, प्रकाश पाटील, नामदेव चौधरी यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविक व वारकरी उपस्थित होते.

संजय पाटील यांनी सुत्रसंचालन केले. प्रास्ताविक जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केले. विकास पाटील यांनी आभार मानले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment