मणियारच्या शस्त्र परवान्यावर जिल्हाधिकारी ४ नोव्हेंबरला घेणार निर्णय

---Advertisement---

 

जळगाव : कंबरेला पिस्तुल लावत पैश्यांची उधळण केल्या प्रकरणी पीयूष मणियार याचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून दुसऱ्यांदा जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे ४ नोव्हेंबरला सुनावणी होणार असून निर्णयाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

पोलीस मल्टिपर्पज सभागृहात दिवाळी सुफी नाईट या कार्यक्रमाचे तीन न्यूज पोर्टलव्दारे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कंबरेला पिस्तूल लावून पीयूष मणियार यानी पैशांची उधळण केल्याचा व्हीडीओ समाजमाध्यमात प्रसारित झाला. याप्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाकडून मणियार याच्या विरुध्द बुधवारी (२२ ऑक्टोबर) जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनियार बंधूच्या परवान्यावर आमदार मंगेश चव्हाण यांनी यापूर्वीही आक्षेप घेतला होता. यासंदर्भात परवानाबाबत माहिती संकलित करुन एमआयडीसी पोलिसांनी दोन महिन्यापूर्वी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. त्यावर सुनावणी सुरू आहे. ही कायदेशीर प्रक्रिया सुरु असताना शस्त्र परवाना अटीशर्तीचे उल्लंघन केल्याने पीयुष मणियार विरुध्द जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

त्यापाठोपाठ शस्त्र परवाना रद्दचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविला. हा प्रस्ताव तत्काळ पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---