---Advertisement---

Bribe News : जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यास ५ हजार रुपयांची लाच भोवली, एसीबी पथकाने केली रंगेहाथ अटक

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : जळगाव येथील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी सुनिल भागवत (वय ३८), यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau – ACB) जळगाव पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

तक्रारदार हे भौतिक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधिक्षक (वर्ग-२) या पदावर शासकीय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगाव येथे कार्यरत आहे. त्यांनी आपले जुन २०२५ चे वेतन बील मंजूर करून घेण्यासाठी जिल्हा दिव्यांग कार्यालयात संपर्क साधला होता. या दरम्यान आरोपी अधिकारी माधुरी भागवत यांनी कोणतीही त्रुटी न दाखवता पगार बीलावर सही करून पुढे पाठवण्याच्या मोबदल्यात १२ हजार रुपये लाचेची मागणी केली.

---Advertisement---

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी मंगळवारी ( २२ जुलै ) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) लेखी तक्रार केली. त्यानंतर खातरजमा करून सापळा रचण्यात आला. या सापळा कार्यवाही दरम्यान, आरोपी माधुरी भागवत यांनी ५ हजार रुपये (पहिला हफ्ता) स्वतः तक्रारदारकडून पंचासमक्ष स्वीकारले. उर्वरित रक्कम इतर बिले मंजूर झाल्यावर घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यामुळे गुरुवारी (२४ जुलै ) त्यांना लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment