---Advertisement---
जळगाव : अल्पवयीन मुलीचे परस्पर लग्न लावून दिले. शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून पीडितेला लग्नात मिळालेले दागिने संशयितांनी काढून घेतले. या प्रकरणी शुक्रवारी (४ जुलै) रामानंदनगर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे आठ संशयित कायद्याच्या कचाट्यात आले आहेत.
येथील अल्पवयीन मुलीचा संशयितांनी संगनमताने ३ फेब्रुवारी २०२५ रोजी कोल्हापूर येथील तरुणाशी परस्पर विवाह लावून दिला होता. तेव्हापासून आजपावेतो या तरुणीवर अत्याचार केला. पीडितेला लग्नात मिळालेले सोन्याचे दागिने काढून घेतले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन मनीषा उर्फ मीनाषी, दिनेश जैन, मीना बोरसे, सुजाता ठाकुर, मीना जैन, अक्षय जोशी, आशिष गंगाधरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते हे करीत आहेत.
---Advertisement---
पुढे काय ?
पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांकडून पोलीस हे प्रकरण जाणून घेतील. अल्पवयीन मुलीला लग्नास भाग पाडण्यासाठी दबाव अथवा धमकाविले किंवा कसे? याबाबी तपासल्या जातील. पोक्सोअंतर्गत गुन्ह्यात संशयितांवर अटकेच्या कारवाईची तलवार असून तपासाधिकारी कौशल्यपूर्ण तपासाला सुरुवात करुन दोषारोप तयार करतील. दरम्यान कोल्हापूरच्या तरुणाने लग्नात मध्यस्थी करणाऱ्यांनी फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासाने आली गती
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची मिसिंग रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली. अल्पवयीन मुलगी सासरच्या गावाहून माहेरी निघुन गेल्याची कोल्हापूरच्या तरुणाने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तपासचक्र फिरविले. पीडित मुलीचा शोध घेऊन तिला जळगाव येथे आणले. तिच्या तक्रारीनुसार आठ जणांवर पोक्सो दाखल केला.