---Advertisement---
जळगाव : भाजपा महायुती महिला पदाधिकाऱ्यांतर्फे शुक्रवारी (८ ऑगस्ट ) जळगाव शहरात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात केलेल्या अयोग्य व असभ्य विधानाचा तीव्र निषेध करीत त्यांच्या व्यंगचित्राला शाई फासण्यात आली. या निषेध आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत एकात्मतेचा संदेश दिला.
या वेळी प्रमुख उपस्थितीमध्ये जळगाव शहराच्या आमदार सुरेश भोळे, भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्यामजी चौधरी, आरपीआय जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, माजी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, ज्ञानेश्वर पाटील, अरविंद देशमुख,भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा वर्मा, आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, नरेंद्र मोरे, राजेश साळुंखे, किरण अडकमोल, संदीप सपकाळे, मिलिंद विकी अहिरे, आरपीआय महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मंगला कुमावत, रेखा अहिरे, मीनाक्षी सोनवणे, आशा वानखेडे, सोनाली अडकमोल उपस्थित होते. यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
निषेध आंदोलनात सहभागी झालेल्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, एसटी मोर्चाचे राजेंद्र सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, पितांबर भावसार, मंडळ अध्यक्ष दीपमाला काळे, भूषण लाडवंजारी, राहुल पाटील, विनोद महाजन, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील, आशिष सपकाळे, सागर पाटील, शुभांगी बिराडे, नंदिनी दर्जी, संगीता पाटील यांचा समावेश होता.
सदर आंदोलनात महिलांप्रती असभ्य वक्तव्य करणाऱ्यांना सुनावणं आवश्यक असल्याचे वक्तव्य करण्यात आले व महिला सन्मानासाठी अशा वक्तव्यांचा तीव्र निषेध करण्यात आला.