सावदा : सावदा येथील सर्वात जुनी दुध उत्पादक संस्था सावदा सहकारी दुध उत्पादक संस्था मर्या. सावदाची सन २०२५ ते २०३० या कार्यकाळासाठीची पंचवार्षिक निवडणूक बुधवारी (२८ मे) रोजी बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत १७ जागा पैकी १६ बिनविरोध निवडून आल्या तर एक जागा रिक्त राहिली.
सावदा सहकारी दुध उत्पादक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वसाधारण गटातून राहुल वाणी, भरत नेमाडे, परीक्षित वाणी, धनंजय चौधरी, संजय चौधरी, मुरलीधर राणे, रवींद्र नेमाडे, किरण पाटील, जगदीश बढे, विजय वाघुळदे, रवींद्र बेंडाळे, कुशल जावळे यांची बिनविरोध निवड झाली.

इतर मागासवर्गीय गटातून देवानंद बढे यांची तर वी.जा./भटक्या विमुक्त जमाती/विशेष मागास प्रवर्ग हेमराज जोगी, महिला राखीव गटातून ज्योत्स्ना बोंडे, सुलभा चौधरी अशा १६ जणांची बिनविरोध निवडून आले. तर एक जागा रिक्त राहिली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.एस.पाटील यांनी काम पाहिले, तर निकालानंतर नवनियुक्त संचालक यांचे हितचिंतक व कार्यकर्ते यांनी ढोल ताश्याच्या गजरात व फटाक्याची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला. तर नवनियुक्त संचालक जगदीश बढे यांनी बोलताना सांगितले की, संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी मिळून पर्यन्त केले, त्यामुळे हे शक्य झाले. या बिनविरोध निवडणुकीमूळे संस्थेचे व पर्यायाने दूध उत्पादकांचे सुमारे अडीच लाख रुपये वाचले जे निवडणूक खर्चासाठी लागणार होते असे प्रतिपादन यावेळी केले. तर आता या बीनविरोध संचालक निवडीनंतर सर्वांचे लक्ष चेअरमन निवडीकडे लागणार आहे.