पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणुकांची घोषणा; ४ मे रोजी मतमोजणी, बारामती-राहुरीतही पोटनिवडणूक

---Advertisement---

 

New Delhi : पश्चिम बंगालसह देशातील ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन केली. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू पुद्दुचेरी आणि केरल राज्यात निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकांच्या तारखांची पत्रकार परिषद घेत घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहे, दि. २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होईल, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. पाचही राज्यातील विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपुष्टात येत आहे.

पाच राज्याच्या निवडणुकीच्या तारखा पुढीलप्रमाणे आहे, केरळमध्येही १४० विधानसभा सदस्यांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. …

मोठी बातमी! पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणुकांची घोषणा; ४ मे रोजी मतमोजणी, बारामती-राहुरीतही पोटनिवडणूक
नवी दिल्ली : देशातील महत्वाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत केली. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी १५२ मतदारसंघांमध्ये तर दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी १४२ मतदारसंघांमध्ये मतदान होईल.

केरळमध्ये १४० जागांसाठी ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होईल. आसाममध्ये १२५ मतदारसंघांमध्ये ९ एप्रिल रोजी मतदान होईल. तर तामिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या सर्व राज्यांच्या निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी जाहीर केले जाणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रमधील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघांसाठीही पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की, या निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. पाच राज्यांमध्ये सुमारे १७.४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून २५ लाख कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कार्यरत राहतील. देशभरात एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघांसाठी २.१९ लाख मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांत निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचा दौरा करून राजकीय पक्षांशी चर्चा केली, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि निवडणूक यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---