जळगाव : मुले सकारात्मक पध्दतीने घडत असतात त्यांच्या आवडीनुसार काम करू द्या, अनेकवेळा मुलांच्या कला दाबल्या जातात पालक त्यांना हे करू नको, ते करू नको, अभ्यास कर अहो चित्रकला हा पण अभ्यासाचा भाग आहे.मुलांना रागवू नका चित्रकलेतही आता करिअर असल्याचे भुसावळ येथील(सेंट्रल रेल्वे सिनीयर सेकंडरी इ. एम.स्कुल भुसावळ) चे सेवानिवृत्त जेष्ट कलाशिक्षक यांनी गुण गौरव सोहळा प्रसंगी प्रतिपादन केले.
येथिल पिंप्राळा परीसरातील कलादर्शन ड्राॅईंग क्लासेसतर्फे एलेमेंटरी/ईंटरमिजिएट परिक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला. प्रारंभी स्वागतगित- अनुश्री दुसाने, भक्ती जाधव, अवंती किनगे,खुशाली पाटील,विभा पाटील यांनी सादर केले. यानंतर एलेमेंटरी / ईंटरमिजीएट परिक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थाना स्मृतिचीन्ह (ट्राॅफी)देण्यात आले. यावेळी कार्यक्रमास राजेंद्र जावळे, अरविंदजी सोनवणे, गिरीष डेरे, जितेंद्र चौधरी , तसेच नृत्यकला दिग्दर्शक नरेश बागडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.
मुलांना कलेची आवड असेल तर पालकांनी त्यांच्या कलेस प्रोत्साहन दिले पाहिजे. व कला क्षेत्रातील ऊच्च ग्रेड आपण प्राप्त करू शकतो. तसेच जितेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की, कितीही नवनवीन टेक्नाॅलाॅजी आली तरी हाताने केलेली पेंटींग श्रेष्ट व मौल्यवान असते. त्याची बरोबरी कशासोबत केली जाऊ शकत नाही.
यानंतर भुसावळ येथील कलाक्षेत्रातील आवड असणारी भुसावळ येथील विद्यार्थीनी राशी पाटील जी दिव्यांग आहे, तिने तोंडात ब्रश धरून पोट्रेट व जिभेच्या साहाय्याने पियानोवर एक गीत सर्वांसमोर प्रत्यक्षदर्शी दाखवले. हे सर्व लाईव्ह बघीतल्यानंतर प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने प्रमुख पाहुणे, पालक व विद्यार्थ्यांनी तिचे स्वागत केले.
यानंतर पु. ना. गाडगीळ अॅन्ड सन्सचे व्यवस्थापक यांनी मार्गदर्शन करतांना बोलले की,कलेबद्दल असलेली आस्था, जिद्द व चिकाटी पाहुन मी खुप प्रभावित झालो. क्लासचे संचालक विजय चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक,मार्गदर्शन, व आभार मानले. जान्हवी जोशी व मनिषा कुळकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी अभिराज चव्हाण, दक्ष पाटील, भाग्यश्री चव्हाण, तेजस्वीनी चव्हाण, चैतन्य पाटील, ओंकार जोशी, यांनी परिश्रम घेतले.