---Advertisement---

फुले मार्केट मधील अतिक्रमण कायमच; व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

---Advertisement---

जळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केट परिसरातील अतिक्रमण समस्या अद्याप सुटताना दिसत नाही. ३० मे रोजी व्यापाऱ्यांनी या समस्येविरोधात एक दिवस दुकाने बंद ठेवून महापालिकेवर मोर्चा काढला होता. परंतु, आज मंगळवारी (१ जुलै ) रोजी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे ट्रॅक्टर मार्केटमध्ये उभे असतांना या ट्रॅक्टर समोरच हॉकर्स आपली दुकाने थाटून व्यवसाय करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

सेंट्रल फुले व फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी (३० मे ) रोजी अतिक्रमण निर्मूलन करण्यात यावे यामागणी करीता मोर्चा काढत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेतली होती. या भेटीत मार्केटमधील हॉकर्सवर ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी आयुक्तांनी व्यापाऱ्यांना मार्केट परिसरातील अतिक्रमण लवकरच हटवण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र, या आश्वासनाला एक महिना उलटूनही महापालिकेतर्फे काहीच ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही.

---Advertisement---

आज मंगळवारी (१ जुलै ) रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे ट्रॅक्टर फुले मार्केट परिसरात उभे होते. तरीही, त्या ट्रॅक्टर समोरच हॉकर्स आणि फेरीवाले आपला व्यवसाय करत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. या दृश्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे व संतापाचे वातावरण दिसून आले. आयुक्तांच्या आश्वासनानंतर देखील सायकांळी ५ वाजेनंतर हॉकर्स आपले दुकान लावत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांनी आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनाचा काय उपयोग, जेव्हा प्रत्यक्षात काहीच कारवाई होत नाही? असा सवाल उपस्थित केला. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून ही उदासीनता का ? असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी महापालिकेने वेळेवर ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर हॉकर्स मार्केटमध्ये व्यवसाय कसा करु शकतात असा प्रश्न व्यापारी उपस्थितीत करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---