“सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणारच नाही” नवनीत राणांचा इम्तियाज जलीलांना थेट इशारा, 15 सेकंदात काय काय होऊ शकतं ?

---Advertisement---

 

मुंब्रा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा होईल, असे वक्तव्य एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या विधानावरून भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून माजी खासदार नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नवनीत राणा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तुमच्या सात पिढ्या जरी आल्या तरी हा महाराष्ट्र कधीच हिरवा होणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, “आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही दुर्बल नाही. गरज पडल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी पंधरा सेकंदही पुरेसे आहेत.” महाराष्ट्रात आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तांचे आणि मावळ्यांचे रक्त वाहत असल्याचे त्यांनी नमूद केले.

इम्तियाज जलील ज्या शहरात राहतात, त्या शहराचे नाव आता छत्रपती संभाजीनगर असून हे त्यांनी विसरू नये, असेही नवनीत राणांनी ठणकावून सांगितले.

महिलांबाबतच्या वक्तव्यावर संताप….

इम्तियाज जलील यांनी महिलांबद्दल वापरलेल्या भाषेवर नवनीत राणा यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “महिलांचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. सभ्यतेची भाषा वापरली नाही तर महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

त्या पुढे म्हणाल्या की, “या देशात अल्पसंख्यांक म्हणून सन्मानाने राहा. धमक्या देऊन महाराष्ट्र झुकणार नाही. शिस्तीत रहा आणि संविधानाच्या चौकटीत आपले काम करा.”

या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, येत्या काळात या वादावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---