बँक खात्याची माहिती घेत शेतकऱ्याची पावणे तीन लाखाहून अधिकची फसवणूक

---Advertisement---

 

जळगाव : जास्त नफ्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर बँक खात्याची माहिती घेत शेतकऱ्याची तब्बल २ लाख ९२ हजार ३६३ रुपयांची संशयिताने फसवणूक केली. याप्रकरणी शनिवारी (११ एप्रिल) याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सुरज कुमार ३६ वर्षीय तक्रारदार शेतकरी जळगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत तक्रारदार यांच्या मोबाइल टेलिग्राम या सोशल मीडिया ॲपवर त्यांना लिंक आली. ती लिंक त्यांनी ओपन केली. रजिस्ट्रेशन केले.

त्यानंतर टेलिग्रामवरुन अज्ञात इसमाने शेतकऱ्याचा विश्वास संपादन केला. त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन अधिक रक्कम मिळेल, असे आमिष दाखविले. तक्रारदार यांच्या टेलिग्रामवर प्राप्त झालेल्या युपीआय तसेच सुरज कुमार याचे नावे असलेले पंजाब अँड सिंध बँक झील पटलाला यावर तक्रारदार यांच्या स्टेट बँक खात्यातून युपीआयव्दारे वेळोवेळी पैसे ट्रान्सफर केले.

एअरपाझ स्टार्ट ट्रॅव्हिलिंग नोव यावर तक्रारदार यांचे नाव तयार झालेल्या खात्यावर (वायलेट) मध्ये वाढीव रक्कम दाखविली. त्यानंतर संशयिताने २ लाख ९२ हजार ३६३ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने पोलिसात कैफियत मांडली. याप्रकरणी सुरज कुमार संशयित बँक खाते तसेच इतर अज्ञात इसमाविरोधात तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार दीपक चौधरी हे तपास करीत आहेत.

ही दक्षता नेहमी घ्या

काहीच माहिती नसलेली आणि अनोळखी व्यक्तीने पाठविलेली लिंक कदापिही ओपण करु नये. आपली व्यक्तीगत माहिती, बँक खात्याचा क्रमांक कोणालाही देवु नये. अमिष अथवा फायद्याचे अनोळखीने सांगीतलेल्या गोष्टीवर कधीही विश्वास ठेऊ नये. कोणत्याही प्रकारचा धाक दाखवून कोणी दबाव टाकत असल्याचे लक्षात आल्यास घाबरु नये. सायबर पोलिसांकडे अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार त्वरीत द्यावी. यामुळे आर्थिक फसवणूक होण्यापासून बचाव करता येईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---