खानदेशच्या शेतकऱ्यांनो सावधान! काढणीला आलेली पिके वाचवा; राज्यात तीन दिवस वादळी पावसासह गारपिटीचा इशारा

---Advertisement---

 

महाराष्ट्रात १७ ते २० मार्चदरम्यान हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह मेघगर्जना, वादळी वारे आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


१७ मार्च रोजी दक्षिण महाराष्ट्रातील भागांमध्ये वादळी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता असून विशेषतः तेलंगणा आणि कर्नाटक सीमेलगतच्या जिल्ह्यांवर त्याचा प्रभाव दिसू शकतो. त्यानंतर १७ ते २० मार्चदरम्यान या पावसाचा प्रभाव राज्यातील इतर भागांमध्येही वाढण्याची शक्यता आहे. २१ मार्चपासून हवामान स्थिर होण्याचे संकेत आहेत.


दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने या बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे काढणीला आलेली पिके तातडीने सुरक्षित ठिकाणी साठवावीत, तसेच बाजारात आणलेला धान्यसाठा ताडपत्री किंवा इतर संरक्षणात्मक साधनांनी झाकून ठेवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


तसेच मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी शेतकरी व नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, वीज खांबाजवळ किंवा ट्रान्सफॉर्मरच्या आसपास थांबणे टाळावे. पाळीव जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


एकूणच, पुढील तीन दिवस हवामानाचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---