Taloda News: तळोद्यात अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद

तळोदा : तालुक्यातील रांझणी गावात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या वावर सुरू होता. या भागात नागरिकांमध्ये ,शेतकरी,शेतमजुर प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्यास जे बंद करण्यासाठी वन विभागाने गेल्या तीन दिवसापासून बिबट्याला जेरबद करण्यासाठी देविदास कदम यांच्या शेतात सापळा लावला होता. त्यात पहाटे बिबटया जेरबद झाला आहे. गेल्या ४२ दिवसात ५ बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि देविदास कदम यांच्या रांझणी शिवारातील शेतात दोन दिवस अगोदर एका बोकडवर ताव मारल्याची घटना घडली होती. याबाबत वन विभागा माहीती देण्यात येवून सदर बिबटयास जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली.  याठीकाणी वन विभागाने सापळा लावून पिंजरा लावला. प्रविण कदम हे पाहटे गाईचे दुध धुण्यासाठी गेला असता त्याला पिंजऱ्या बिबटया जेरबंद झाले दिसला.  लगेच वनविभागाला कळविण्यात आले.

वन विभागाची टिम येवून घटनास्थळा पिंजरा सकाळी ६ वाजत हलवून त्याला मेवासी वनविभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आला आहे. तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने शेतकरी, शेतमजुर आपला जिव मुठीत धरून आपली शेतीची कामे करत आहेत.  सध्या कापूस काढणी सुरुत्वात झाली असून बिबट्याच्या भितीने शेतकऱ्याना जास्त मजुरी द्यावी लागत आहे.  तसेच खेडया पाडयातील नागरीक तालुक्याच्या ठिकाणी आपली कामे दिवसभरात करून अंधार पडण्या अगोदर निघत असल्याने रात्रीच्या वेळी खेडया पाडयातील रस्ते ओस पडत आहेत.

बिबटे रोज कोणत्या ना कोणत्या भागात आपले दर्शन देत असतात वनविभागाचे कर्मचारी तालुक्यात रात्रदिवस गस्त घालत आहे पंरतू त्यांना बिबटयाना अटकाव करण्यात फारसे यश मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.