आधी वनरक्षकावर हल्ला, नंतर वाघीणच आढळली मृत ! सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील घटना

---Advertisement---

 

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे वनरक्षकावर हल्ला करून जखमी केल्यानंतर वाघिणीचाही शेतशिवारात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

रत्नापूर येथील शंकरपटाच्या दाणीजवळ दामोदर गनबाजी लोधे यांचे शेत आहे. ही वाघीण आपल्या तीन बछड्यांसह शिवटेकडी नजीक बऱ्याच दिवसांपासून वास्तव्यास होती. तिचे दर्शन बऱ्याच गावकऱ्यांना झाले. तिचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी रत्नापूर, नवरगाव, नाचणभट्टी, मीनघरी व आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी होती.

रत्नापूर परिसरात रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास मक्याच्या शेतामध्ये ही वाघीण भ्रमण करीत असल्याचे स्थानिक ग्रामवासीयांच्या निदर्शनास आले. तिला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. दरम्यान, नाचणभट्टीचे वनरक्षक सज्जन पारेकर व सोबत असलेले वनमजूर दुपारी गस्त घालत असताना त्यांच्यावर या वाघिणीने हल्ला केला. त्या हल्ल्यात वनरक्षकाच्या पायाला व हाताला गंभीर इजा झाली. आजूबाजूच्या शेतशिवारातील ग्रामस्थ एकत्र येऊन वाघिणीला हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केला. पाठलाग केल्याने आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे वाघीण थकलेली होती.

पाण्याअभावी दामोदर लोधे यांच्या शेतशिवारात तिचा मृत्यू झाला असावा. मृत वाघिणीचे वय अंदाजे ९ ते १० वर्षे होते. दरम्यान, जखमी वनरक्षकाला चंद्रपूर येथील जिल्हा समान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---