शहरात किरकोळ कारणावरुन हाणामारी, दोन्ही कुटुंबातील पाच जण जखमी

---Advertisement---

 

जळगाव : दोन गटात हाणामारी झाली. या दोन कुटुंबातील एकुण पाच जण जखमी झाले. तक्रारीनुसार परस्पर तक्रारीनुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बुधवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी कासमवाडी परिसरात घडली.

खाटीक यांच्या अकील हनीफ (वय ४८, रा. कासमवाडी) तक्रारीनुसार तक्रारदार यांचा मुलगा नविद याला एकाने शिवीगाळ केली. त्याचा जाब केला असता चौघांनी नविद याला मारहाण केली. लोखंडी हत्यार मारल्याने त्याला दुखापत झाली. भांडण सोडविण्यास त्याची आई आली असता त्यांनाही संशयितांनी मारहाण केली. या घटनेत नविन खाटीक तसेच फैमिदा बी अकिल खाटीक हे जखमी झाले. नासीर बशीर खाटीक, आवेश खाटीक, दानीश खाटीक, परवेश खाटीक (रा. सर्व सालारनगर) यांच्या विरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या गटातील नासिर बसिर खाटीक (वय ४८.रा. कासमवाडी) यांच्या तक्रारीनुसार, सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तक्रारदार यांचे चिकन विक्री दुकानासमोर कासम वाडीत तक्रारदार यांच्या पत्नी शाईन तसेच मुलगा दानिश अवेश खाटीक, परवेश खाटीक असे काम करत होते. तेव्हा महिलेसह चौघांनी दुकान लावु नका. दुकान लावल्यास सोडणार नाही, असा दम भरला. एका संशयिताने खिशातुन चाकु काढत तक्रारदार यांचा मुलगा परवेश याच्या चेहऱ्यावर वार केला. दुसऱ्याने लोखंडी रॉडने मारहाण करत महिलेस दुखापत करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यात दानिश खाटीक, परवेश खाटीक तसेच शाईन खाटीक (सर्व रा. कासम वाडी) हे जखमी झाले. याप्रकरणी नाविद खाटीक, अकिल खाटीक, रियान खाटीक, तसेच तक्रारदार यांच्या पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---