---Advertisement---

वनविभागाच्या गस्ती पथकाद्वारे वृक्षांची अवैध तोड करीत वाहतूक करणारे वाहन जप्त

---Advertisement---

यावल : वृक्षांची अवैधरित्या तोड करुन वाहतूक करणारे वाहन वनविभागातर्फे जप्त करण्यात आले. ही कारवाई भोरटेक शिवारात करण्यात आली असून या वाहनासह अंदाजे १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वनविभागाला भोरटेक शिवारात वृक्षांची अवैध तोड सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार वनविभागाने गस्त घालून एक पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्ती पथक यावल यांना भोरटेक शिवारात अवैध वृक्षतोडीबाबत तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रार अर्जानुसार यावल आगार रक्षकासह गस्ती पथक यावल भुसावळ रस्त्याने गस्त करीत असताना संशयित पिकअप वाहनांची तपासणी केली. तपासणीत वाहनात निंब, बाभूळ, जळाऊ लाकडे मिळून आली.

---Advertisement---



वाहन चालक ज्ञानेश्वर कोळी यांना सदर मालाच्या वाहतूक पासबद्दल विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना मिळून आला नाही. त्यामुळे वाहनासह जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव, साहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्प) यावल, वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्ती पथक यावल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाही दरम्यान आगार रक्षक यावल बी. बी. गायकवाड वनरक्षक गस्ती पथक आय. बी. चव्हाण तसेच पोलीस (कॉ.) एस. आर. तडवी, योगिराज तेली उपस्थित होते.


Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---