जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा पंपिंगच्या जुन्या पाइपलाइनचीगिरणा पंपिंगच्या जुन्या पाइपलाइनची विक्री तसेच जलशुध्दीकरणाचे दरवाजे, खिडक्या व अन्य भंगार साहित्याच्या विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित कुंदन पाटील याला शनिवार, १४ रोजी न्यायालयाने सोमवार, १६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्यातील संशयित निरंजन पाटील हा पथकाच्या रडारवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मनपा मालकीची जुनी पाइपलाइन चोरी व भंगार विक्रीप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन, तर रामानंदनगर पोलीस ठाण्यात एक, असे एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने त्याला दिंडोरी येथे शुक्रवारी ताब्यात घेत तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले.
कुंदन पाटील होता कामाला
मनपा विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांच्याकडे कुंदन पाटील हा सुपरवायझर म्हणून कामाला होता. कामाच्या साईडवर जाणे, आर्थिक व्यवहार पाहण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. जुनी पाइप चोरी व विक्रीचा व्यवहार तो हाताळत होता. त्यामुळे हे पाइप तसेच भंगार साहित्य कोणाला, कुठे व कसे विकले ? या व्यवहारात कोणाचा सहभाग आहे. मध्यस्थी कोणी केली? याची चौकशी त्याच्याकडून केली जात आहे.
दापोरा साईटवर जबाब घेणार
दापोरा येथील पाइपलाइन जलशुद्धीकरण साहित्य प्रकरणी प्रत्यक्षदर्शी तसेच शेतकऱ्यांचे जबाब घेण्याला सुरुवात केली जात आहे. दापोरा येथे पाइपलाइन खोदण्यापूर्वी कोणाकोणाशी बोलणी केली? त्यात कोणी सहमती दिली. त्यामागचा हेतू काय ? या अनुषंगाने तपासचक्रे फिरविली जाणार असल्याचे समजते.
निरंजन पाटलाचा रोल काय?
गुन्ह्यातील संशयित निरंजन पाटील याचा पथक शोध घेत आहे. सुनील महाजन यांच्यामार्फत निरंजन पाटील हा गिरणापंपिंग जलशुध्दीकरण व दापोरा पंपिंग, उमाळा जलशुध्दीकरण केंद्र येथे स्क्रॅप झालेले साहित्य काढण्याचे काम चालू केले होते. या कामात अक्षय अग्रवाल, भावेश पाटील, अमिन राठोड, कुंदन पाटील हे सहभागी होते. सुनील महाजन मार्फत निरंजन पाटील व कुंदन पाटील यांनी निविदेतील उर्वरित रक्कम ३३ लाख ३९ हजार ४०० रुपये रोख रक्कम बँक खात्यामध्ये भरणा केला होता. त्यानंतर ही रक्कम आरटीजीएसद्वारे मनपात जमा केली होती. हा सर्व कारभार कशा पद्धतीने केला होता, हे तपासातून जाणून घेण्यासाठी निरंजन पाटील पोलिसांना ताब्यात हवा आहे. त्याच्या मागावर पथक असून तो लवकरच हाती लागेल, असा विश्वास पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी व्यक्त केला.
एसआयटीतर्फे तपासाला वेग
पाइपलाइन चोरी व भंगार विक्री प्रकरणी गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या नेतृत्वात एसआयटी पथकात पोलीस निरीक्षक महेश शर्मा, सपोनि अनंत अहिरे, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कैलास दामोदर यांचा समावेश आहे. गुन्ह्याची व्याप्ती, स्वरूप आणि त्याला वळण कशा पद्धतीने दिले? कोण सहभागी या अनुषंगाने पथकाकडून तपास