जळगाव : जिल्ह्यातील ४ पोलीस उपनिरीक्षक मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. यात पोलीस मुख्यालयातील सुनील लक्ष्मण वडनेरे, वरणगाव पोलीस स्टेशनचे अनिल भानुदास चौधरी, फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे शरद जगन्नाथ शिंदे, आणि निंभोरा पोलीस स्टेशनचे राजेंद्र काशिनाथ पाटील यांचा समावेश आहे.
या चारही पोलीस उपनिरक्षकांचा विशेष सन्मान पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते करण्यात आला. या सन्मान सोहळ्याला सर्व पोलीस उपनिरीक्षकांचे कुटुंबीय उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी या चारही उपनिरीक्षकांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी पोलीस सेवेत आयुष्य समर्पित केलेल्या या अधिकाऱ्यांचे कार्याबद्दल बोलताना सांगितले की, “जेव्हा पोलिसांना नोकरी मिळते तेव्हा त्यांचं कुटुंब सन्मानित होते आणि ते त्यांच्या कार्यकाळात देशसेवा बजावत सेवानिवृत्त होतात.” या चारही पोलीस उपनिरीक्षकांच्या सेवेला सलाम करतो असेही कौतुक केले. या वेळी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.