Fraud News: नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; पोलिस अधिकाऱ्याच्या भावावर गुन्हा दाखल

नंदूरबार : जिल्ह्यातील धडगाव शहरात एका मध्यमवर्गीय सुशिक्षित तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून  १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाचे वडील चहाची टपरी चालवतात आणि आई फळ विकून घर चालवते. या आर्थिक फसवणुकीने तरुणासह त्यांच्या कुटुंबीयांवर मोठ संकट आले आहे. याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश मोरे असे फसवणूक झालेल्या तरुणांचे नावं आहे. त्याचे कॉम्प्युटर इंजीनियरिंग शिक्षण पूर्ण आहे आहे. तो त्याच्या आई – वडिलांसह धडगाव शहरात वास्तव्याला आहे. कोरोना काळात योगेशला आपली नोकरी  गमवावी लागली होती. नोकरी गेल्याने तो घरीच राहत होता. याच दरम्यान, आकाश अहिरे नामक पोलीस अधिकाऱ्याच्या भावाने त्याला नोकरीचे आमिष दिले. आकाश अहिरे याने स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई शाखेत नोकरी लावून देण्याचे सांगत त्याच्याकडून १४ लाख रुपयांची मागणी केली.

योगेश याला  १४ लाख रुपये देणे शक्य नसल्याने तडजोडीनंतर १२ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरवले. हे पैसे टप्प्य्टप्प्याने कॅश स्वरूपात संबंधितांच्या बँक खात्यात पाठवत होता. हे पैसे दिल्या गेल्यानंतर योगेशला जॉइनिंग लेटर पाठविण्यात आले. हे लेटर एका महिलेच्या व्हाट्सअपच्या माध्यमातून पाठविण्यात आले.  योगेशला स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई शाखेत जॉइनिंगसाठी बोलविल्यात आले. हे जॉइनिंग लेटर घेऊन योगेशने मुंबई गाठले. परंतु, तेथील सर्व कागतपत्रे आणि नोकरीची पडताळणी केल्यानंतर त्याला फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. ही घटना आता पोलिसांच्या तपासाअंतर्गत आहे,  योगेशने संबंधित महिला आणि चार जणांकडे संपर्क करुन पैशाची मागणी केली. मात्र वारंवार पैसे मागूनही देत नसल्याने अखेर योगेशने पोलीस ठाणे गाठून फसवणूक करणाऱ्या या चौघांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.