---Advertisement---

पिंप्राळा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

---Advertisement---

जळगाव : येथे कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्था व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शनिवारी ( १९ जुलै) सोमाणी मार्केट आयोजित करण्यात आले होते. हा अनोखा उपक्रम संस्थेचे मार्गदर्शक चत्रभुज सोनवणे, जगन्नाथ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर सीमा भोळे ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अभिजित काकड, डॉ. वरुण नन्नवरे उपस्थित होते.

---Advertisement---

कोळी समाज संस्थेतर्फे वेळोवेळी समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात. या शिबिरात १०० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला व प्रामुख्याने गरजवंत रुग्णांची मोफत तपासणी करून मोतिबिंदू शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करण्यात येणार आहे,असे संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष रवि कोळी,उपाध्यक्ष संजीव बाविस्कर,सचिव अनिल कोळी,खजिनदार सुधाकर बाविस्कर,प्रमुख अतिथी म्हणून गोपाळशेठ नन्नवरे,संभाजी सोनावणे,गोकुळ सूर्यवंशी,सतीश सपकाळे, शिवाजी सूर्यवंशी, दीपक कोळी, रतन बिऱ्हाडे, भरत सपकाळे, जय सोनवणे, गणेश बाविस्कर, नरेंद्र सपकाळे व पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---