जळगाव-जालना रेल्वे मार्गासाठी 5 हजार 804 कोटींचा निधी मंजूर; लवकरच भूसंपादन सुरू होणार….!

---Advertisement---

 

जळगाव जालना या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 5804 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या तरतुदीमुळे नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला गती येणार आहे.

जळगाव जालना या नवीन 174 किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 5804 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला आता गती मिळणार असल्याचं स्पष्ट झाला आहे. जळगाव जालना या 174 किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी याचा भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या वर्षात या मार्गासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रेल्वेच्या पथकामार्फत सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पास मंजुरी मिळाली होती. आणि जळगाव जालना या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी सुमारे सात हजार कोटींचा अपेक्षित खर्च असल्याच समोर आला आहे.

जळगाव ते जालना (१७४ किमी) प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गावर सुमारे १७ ते १८ स्थानके नियोजित आहेत, जी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडतील. या मार्गावर नशिराबाद, पहूर, सिल्लोड, भोकरदन आणि अजिंठा लेणी यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश असून, या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

प्रस्तावित रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानके खालीलप्रमाणे आहेत:

१. जळगाव (सुरुवातीचे स्थानक)
२. नशिराबाद
३. धानवड
४. नेरी
५. सुनसगाव बुद्रुक
६. पहूर
७. वाकोद
८. अजिंठा लेणी
९. अन्वी
१०. सिल्लोड
११. भोकरदन
१२. सोयगाव (किंवा केदारखेडा)
१३. केदारखेडा
१४. राजूर
१५. बावने पांगरी
१६. पिंपळगाव
१७. नागेवाडी
१८. दिना गाव
१९. जालना (अंतिम स्थानक)

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---