---Advertisement---

तरुण कुढापा मंडळाचे गणेशोत्सव पाटपूजन सोहळा उत्साहात

---Advertisement---

जळगाव : जुने जळगाव परिसरातील नेरी नाका येथील तरुण कुढापा मंडळाचा गणेशोत्सव २०२५ चा पाटपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

तरुण कुढापा मंडळाचा पाटपूजन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, विश्व हिंदू परिषदेचे ललित चौधरी, माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे, सार्वजनिक गणेश महामंडळाचे दीपक जोशी, डॉ. निलेश चांडक, उद्योगपती नंदू चौधरी, सामाजिक कार्यकर्ते पीयूष कोल्हे, पीयूष नरेंद्र पाटील, बंटी भारंबे, भारत बेंडाळे आदी उपस्थित होते.

---Advertisement---


तरुण कुढापा मंडळ हे नेहमीच सामाजिक व सांस्कृतिक कामात अग्रेसर असते. मंडळाचे हे ६२ वे वर्ष असून या मंडळाला धार्मिक परंपरा ही लाभली आहे. या पाटपूजन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक मराठे, उपाध्यक्ष निवृत्ती पाटील यांच्यासह राजेंद्र पाटील, सतीश ठाकुर, शंभू भावसार, भोजराज बारी, नारायण कोळी, पंकज भावसार, बंटी चौधरी, अनिल चौधरी, रवींद्र माळी, चेतन चौधरी, राहुल कोळी, मोहित पाटील, जयेश अत्तरदे, विकी ठाकूर, जयेश कोल्हे, हरीश चौधरी, सुमित सपकाळे, गौरव सोनार, निलेश माळी, यश मराठे, रोहन कोल्हे आदींनी परिश्रम घेतले. प्रशांत सुरळकर यांनी सूत्रसंचालन केले. विशाल पाटील यांनी आभार मानले. या वर्षीच्या पाटपूजनाचा मान मयूर रमेश धनगर व सपना मयूर धनगर यांना मिळाला होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---