वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलीसांवर हल्ला…! संघटित टोळीचा पर्दाफाश ; गावठी पिस्तूल, सोन्याच्या लगडी आणि 16 मोटारसायकली जप्त.

---Advertisement---

 

मध्यप्रदेशसह जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे करणाऱ्या संघटित टोळीचा भुसावळ येथे मोठ्या कारवाईत पर्दाफाश झाला आहे. वॉरंट बजावणीदरम्यान पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार मध्यप्रदेशातील बडोद येथे घडल्यानंतर या टोळीचा तपास वेगाने पुढे गेला. सद्यस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर….

मध्य प्रदेशातील बडोद येथे 15 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरोपी करार अली हुजूरअली हा मुरलीग कॉलनी परिसरात लपल्याची माहिती मिळाली या नंतर पोलिसांनी सापळा रचत घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलीस पथक कारवाईसाठी पाठवले. मात्र, जमावबंदीचे आदेश झुगारून महिला व पुरुषांच्या टोळक्याने पोलिसांवर विटा, लाकडी दांडे वापरून हल्ला केला. झटापट, हाणामारी, शिवीगाळ, धमकी देत पोलिसांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या घटनेनंतर आरोपी भुसावळमध्ये पळून आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने भुसावळ बाजारपेठ परिसरात कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले. कारवाई दरम्यान एका घरातील लोखंडी कपाटात प्लास्टिक पिशवीत मोठ्या प्रमाणात पिवळ्या धातूच्या सोन्याच्या लगडी आढळून आल्या. संशयित महिलांच्या चौकशीत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील विविध शहरांमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने हिसकावून ते वितळवून विक्री केल्याची माहिती समोर आली. तपासात आतापर्यंत एकूण 16 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी अंदाजे लाखो रुपयांच्या सोन्याच्या लगडी जप्त केली आहे.

याच कारवाईत आरोपी मजहर अब्बास जाफर इराणी याच्याकडून गावठी पिस्तूल, मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली असून शस्त्र अधिनियमानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 16 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यातील एक दुचाकी मुक्ताईनगर येथील गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा आदी पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांशी या टोळीचा संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---