---Advertisement---
जळगाव: आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज सोन्याच्या दरात सुमारे २,५०० रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल ५,००० रुपयांची घट नोंदवली गेली आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात अद्याप कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावर होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने पाच दिवसांसाठी युद्धविराम जाहीर केल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर कोणताही समन्वय न झाल्याने दर पुन्हा घसरले आहेत.
तज्ञांच्या मते, जर युद्धस्थिती कायम राहिली तर सोन्याचे दर १,२५,००० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. तर दुसरीकडे, जर युद्ध थांबले आणि परिस्थिती स्थिर झाली, तर सोन्याचे दर १,७५,००० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत सोने तज्ञांशी आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी संवाद साधला असून, येत्या काही दिवसांत दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.









