रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; तब्बल २८०१ पदांसाठी ही मोठी भरती जाहीर, जाणून घ्या सविस्तर….!

---Advertisement---

 

भारतीय रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल २८०१ पदांसाठी ही मोठी भरती जाहीर झाली आहे. यात विशेष म्हणजे दहावी आणि आयटीआय पास तरुण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली असून या नोकरीसाठी तुम्ही RRC SCR च्या scr.indianrailways.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

या भरतीअंतर्गत एकूण २८०१ पदे भरण्यात येणार आहेत. विविध ट्रेडमध्ये ही पदे उपलब्ध असून इलेक्ट्रिशियन पदांसाठी सर्वाधिक १२५८ जागा आहेत. याशिवाय फिटर पदासाठी ५३९, वेल्डर पदासाठी २०२, एसी मेकॅनिक पदासाठी २५१, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक पदासाठी ८८ आणि कारपेंटर पदासाठी २२ जागा उपलब्ध आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास केलेली असावी. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ असावे. आरक्षिक प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी भरतीसाठी अर्ज कसा करावा?

१. या भरतीसाठी इच्छुकांनी scr.onlineregister.org.in/login या वेबसाइटवर जावे.
२. यानंतर रजिस्टरवर क्लिक करुन तुमची माहिती भरा आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
३. यानंतर लॉग इन करुन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर फी जमा करा.
४. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---