ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; सराफा बाजारात गगनाला भिडलेले सोन्या-चांदीचे दर घसरले…!

---Advertisement---

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरमधील चढ-उतार आणि नफा वसुलीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सराफ बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे दर गगनाला भिडले होते. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घसरण नोंदवली गेली आहे.

गुडरिटर्न्सच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३१० रुपयांनी घसरून १,५६,४४० रुपयांवर आला आहे. २२ कॅरेट सोन्यात सुमारे १,२०० रुपयांची घट होऊन दर १.४३ लाखांवर पोहोचले आहेत. तर १८ कॅरेट सोन्याचा दर जवळपास १ हजार रुपयांनी कमी होऊन १,१७,३३० रुपये झाला आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून एक किलो चांदीचा दर तब्बल ७,००० रुपयांनी खाली आला आहे. सध्या चांदी २,६८,००० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. उच्चांकी पातळीच्या तुलनेत चांदी सुमारे दीड लाख रुपयांनी स्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, Multi Commodity Exchange of India (MCX) वर सोन्याचा दर १ लाख ५५ हजार रुपयांच्या खाली आला असून चांदी २ लाख ३७ हजार रुपयांवर व्यवहार करत आहे. स्थानिक पातळीवर जळगाव सराफा बाजारात गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात सुमारे २ हजार रुपयांची तर चांदीत तब्बल १३ हजार रुपयांची घसरण झाली आहे. सध्या १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५४,५०० रुपये असून चांदी २,४५,००० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

तज्ञांच्या मते, जागतिक व्यवहार धोरणातील बदल, डॉलर निर्देशांकातील हालचाल आणि गुंतवणूकदारांकडून होत असलेली नफा वसुली यामुळे दरात चढ-उतार सुरू आहेत. सध्या जागतिक बाजारात करेक्शन आल्याने सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.

सोने-चांदीच्या दरातील या घसरणीमुळे लग्नसराईत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---