लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर; जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात….!

---Advertisement---

 

महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर असून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जानेवारी हप्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

फेब्रुवारी अखेर आला तरी जानेवारीचा हफ्ता खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांकडून सातत्याने प्रश्न विचारला जात होता. अखेर काल सोमवारपासून जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या तरी पात्र महिलांना फक्त जानेवारीचा हप्ता म्हणून १५०० रुपये मिळत असला तरी फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, याबाबत लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाभार्थी महिलांना अर्थात लाडक्या बहिणींना राज्य सरकारकाडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिना संपायला अवघे काही दिवसच बाकी असल्यानं जानेवारी-फेब्रुवारीचे पैसे एकत्र येतील, अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना होती. मात्र सध्या तरी आता जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. जानेवारीचे १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी यशस्वी केली आहे, आणि या पुढे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ईकेवायसी करण्याची मुदत आता संपली आहे. दरम्यान, ई-केवायसीमध्ये चुका असल्याने अनेक महिलांना मागच्या महिन्याचाही लाभ मिळाला नव्हता. त्या महिलांना या महिन्यात देखील पैसे मिळणार नाहीत. त्यांना मार्च महिन्यानंतर रखडलेले हप्ते एकत्रितपणे दिले जातील. असं सरकार कडून सान्गण्यात आलंय.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---