---Advertisement---

‘कोणत्याही पक्षात जा, पण…’; मंत्री पाटलांचा देवकरांना इशारा

by team
---Advertisement---

जळगाव : गुलाबराव देवकरांनी निवडणुकीसाठी जिल्हा बँकेतून दहा कोटींचं कर्ज काढल्याचं उघडकीस आला आहे. तसेच गुलाबराव देवकर यांच्याविरोधात निवडणूक आयोगकडून ॲन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

गुलाबराव देवकर यांनी अध्यक्ष असताना जिल्हा बँकेतून दहा कोटींचे कर्ज घेतले होते. बॅकेचे संचालक सुरेश पाटील यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली आहे. याप्रकरणात गुलाबराव देवकर यांची चौकशी सुरु आहे. याच प्रकरणावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकरांना कोणताही पक्ष घेणार नाही, त्यांना आतमध्ये जावंच लागेल असा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्यापही त्यांचा प्रवेश निश्चित झालेला नाही. या पक्षप्रवेशावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून यावेळी त्यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.

नेमकं काय म्हणले मंत्री गुलाबराव पाटील ?

निवडणुकीच्या काळात कर्ज काढून कॅश इन हॅन्ड ठेवणं ही अत्यंत चुकीची बाब आहे. याबाबत निवडणूक आयोग व अँटी करप्शनकडे तक्रार करणार आहे, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जिल्हा बँकेचे घेतलेले कर्ज न फेडणे, इतर बँकांचे घेतलेले कर्ज, मजूर फेडरेशनच्या माध्यमातून मजुरांचे पैसे खाल्ले असतील, स्वतःच्या शालेय शिक्षण संस्थेतील शिक्षकांचा पगार न देणे असेल, तसेच कायद्याच्या चौकटीबाहेर 26 लाख रुपये भाड्याने देणे असेल, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर गुलाबराव देवकर यांना कोणताच पक्ष स्वीकारणार नाही. ते कोणत्याही पक्षात गेले तरी गुलाबराव देवकरांना आतमध्ये जावंच लागेल, असा थेट इशारा शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी देवकर यांना दिला आहे.



गुलाबराव देवकरांना आतमध्ये जावंच लागेल… गुलाबराव पाटील यांचा थेट इशारा

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment