---Advertisement---
पाचोरा : पी. एस. एम.एस. स्कूल व ज्युनिअर कॉलेज (बामनोद )येथे गुरुपौर्णिमेनिमित्त निराधार भाग्यश्री योगेश जयकारे या मुलीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी प्राध्यापक शिक्षक व शिक्षतेतर कर्मचारी (प्रोटान ) संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे यांनी घेतली आहे .
बामनोद येथे पी. एस. एम.एस. स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत भाग्यश्री जयकारे ही निराधार विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. भाग्यश्रीचे पाचवी ते सातवी पर्यंतच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारीगणेश काकडे यांनी स्वतःकडे घेतली आहे. व या मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे ही गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु कडून शिष्याला दिली गेलेली एक भेट आहे.
---Advertisement---
भाग्यश्री जयकारे या निराधार मुलीला प्रागतिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र कोल्हे व मुख्याध्यापक आर. एस. अडकमोल व प्रोटान संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे यांच्या हस्ते शाळेचा ड्रेस व शालेय साहित्य देण्यात आले. शाळेतील नव्हे तर पंचक्रोशीत शिक्षण घेत असलेल्या निराधार मुलं व मुलींना मदत करण्यासाठी गणेश काकडे यांनी व त्यांच्या सोबत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे .