---Advertisement---
महाराष्ट्र राज्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ९ आणि १० मार्च हे दोन दिवस राज्यातील अनेक भागांसाठी अत्यंत उष्ण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये ९ मार्च रोजी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच १० मार्च रोजीही या भागात उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातही अत्यंत उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. याचबरोबर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यातील काही भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
नाशिक, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसह काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर निघा किंवा उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील तापमानाची आकडेवारी खालील प्रमाणे….
१. विदर्भ
अकोला – 40.8°C
अमरावती – 40.6°C
वर्धा – 40.0°C
नागपूर – 38.7°C
यवतमाळ – 39°C
चंद्रपूर – 39.2°C
वाशीम – 39.2°C
भंडारा – 38.8°C
गोंदिया – 38.6°C
गडचिरोली – 38°C
२. उत्तर महाराष्ट्र
जळगाव – 38°C
धुळे – 37°C
नंदुरबार – 36.5°C
नाशिक – 36.6°C
३. मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर – 37.5°C
जालना – 37°C
परभणी – 38°C
हिंगोली – 37°C
नांदेड – 38.5°C
बीड – 37°C
लातूर – 36.5°C
धाराशिव – 36.5°C
४. पश्चिम महाराष्ट्र
पुणे – 37°C
सोलापूर – 38.8°C
सातारा – 35°C
सांगली – 37°C
कोल्हापूर – 34°C
५. कोकण
मुंबई – 34°C
ठाणे – 34°C
पालघर – 33°C
रायगड – 34°C
रत्नागिरी – 33°C
सिंधुदुर्ग – 32°C









