कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू

---Advertisement---

 

कल्याण-अहिल्यानगर महामार्ग आज एका भीषण अपघाताने हादरला असून, या दुर्घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण ते मुरबाड प्रवासी वाहतूक करणाऱ्या ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात पुलावर समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की ईको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.


अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व स्थानिक पोलीस प्रशासनही त्वरित दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढले तसेच जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी तत्परतेने हालचाली करत वाहतूक सुरळीत केली.


दरम्यान, मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---