एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

---Advertisement---

 

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठोस आणि सवरकष उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील एसटीच्या आर्थिक काम गिरीचा आढावा घेताना त्यांनी तोटा कमी करण्यावर स्पष्टपणे भर दिला. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीस उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

चालू आर्थिक वर्षात एसटीचे एकूण उत्पन्न ११ हजार ४७५ कोटी रुपये इतके नोंदवले गेले, तर खर्च १२ हजार ६६ कोटी रुपयांवर पोहोचला. परिणामी, महामंडळाला तब्बल ५९१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. दैनंदिन स्तरावर पाहता, सरासरी उत्पन्न ३१.४० कोटी रुपये असताना खर्च ३३ कोटी रुपये असून, दररोज सुमारे १.६० कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

३१ पैकी २३ विभाग तोट्यात राज्यातील एकूण ३१ विभागांपैकी केवळ ८ विभाग नफ्यात असून उर्वरित २३ विभाग तोट्यात आहेत. जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे विभाग नफ्यात असले, तरी नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे यांसारख्या मोठ्या वाढता तोटा गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. तोट्यातील विभागांची सखोल चौकशी करून कारणांचा अभ्यास करावा आणि त्यावर ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे निर्दे शही त्यांनी दिले. तसेच, सातत्याने तोट्यात असलेल्या मोठ्या विभागांमध्ये सक्षम आणि अनुभवी अधिकाऱ्यांची नियुी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी विभागांतील सांगितले.

सुधारणा आराखडा लवकरच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, संसाधनांचा प्रभावी वापर
आणि जबाबदारी निश्चिती या तत्त्वांवर आधारित व्यापक सुधारणा आराखडा लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. एकूणच, एसटीचा वाढता तोटा रोखण्यासाठी आणि सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन आता निर्णायक पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीत देण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---