जळगाव : गेल्या जुलै महिन्यात महिला सक्षमीकरणांतर्गत राज्य शासनाने महिला भगीनींसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत जिल्हाभरातील ९ लाख ७४ हजार महिला भगीनींनी अर्ज केले आहेत. यात बहुतांश महिलांचे अर्ज पात्र असून केवळ २ हजार ४७८ महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तसेच बहुतांश महिला भगीनींना तीन हप्त्यांचा लाभ देण्यात आत्याचेही महिला बाल विकास आली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिला निकषानुसार पात्र आहेत. अशा महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रूपये असा येत आहे. आर्थिक लाभ ‘डीबीटी’ द्वारे देण्यात ग्रामपंचायत, अंगणवाडी, नगरपालिका स्तरावरून अर्ज प्रशासनाने म्हटले आहे.
राज्य शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी. त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासह त्यांची कुटूंबातील स्थान मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना २८ जून २०२४ रोजी मान्यता देण्यात आली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिला निकषानुसार पात्र आहेत. अशा महिलांना दर म हिन्याला १ हजार ५०० रूपये असा येत आहे. आर्थिक लाभ ‘डीबीटी द्वारे देण्यात येत आहे.
ग्रामपंचायत, अंगणवाडी, नगरपालिका स्तरावरून अर्ज
जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ अखेर ९ लाख ७४ हजार ९५० महिलांनी ग्रामपंचायत स्तरावर अंगणवाडी, नगरपालिका. महानगरपालिका तसेच मोबाईल अॅपव्दारे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी अर्ज दाखल केले होते. या अर्जापैकी ९ लाख ६१ हजार ८ महिला भगीनींचे अर्ज जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाकडून मंजूर करण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
९ हजार अर्ज तात्पूरते अपात्र
जिल्हा महिला बाल विभागाकडून पडताळणीअंती ९ हजार ९६७ अर्ज ‘प्रोव्हिजनली तात्पूरते नामंजूर आहेत. तर २ हजार ४५१ अर्ज पूर्णतः अपात्र असल्याने नामंजूर केले आहेत. तसेच १ हजार ४७८ महिलांचे अर्ज मंजूरी प्रकियेत आहेत. दाखल ९ लाख ७४ हजार ९५० अजपिकी ९ लाख ७३ हजार ४२६ महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून संबंधीत बँक खात्यावर तीन हप्त्यांची रकम वर्ग करण्यात आली आहे. असे असले तरी काही महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत.
महिलांची बँकेसह प्रशासनाकडें भटकंती
महिलांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना या योजनेसाठी पात्र असल्याचा व पैसे वर्ग झाल्याचा संदेश देखील आला. परंतु ज्या बँकेचा खाते क्रमांक दिला होता. त्या खात्यावर पैसे वर्ग झालेले नाहीत. अशा अनेक महिलांच्या तक्रारी आहेत. ज्या बँकेचा खाते क्रमांक दिला आहे, त्याच बँकेत पैसे जमा होणे अपेक्षित आहे.
तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळण्यास अडथळे
लाभार्थी पात्र महिलांचा अर्ज मंजूर केला आहे. त्यानुसार बैंक खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आहे. परंतु प्रत्यक्षात खात्यावर पैसे जमा झालेले नसतात. काहीतरी तांत्रिक अडचण असून बँक खाते व मोबाईल जोडणी सह केवायसी नसेल तर अशी अडचण येण्याची शक्यता असल्याचे महसूल तसेच महिला बाल विकास विभाग प्रशासनाकडून सांगण्यात आले.