---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : शहरात श्री जैन युवा फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा रविवार (२७ जुलै) रोजी आयोजित करण्यात आला या सोहळ्यात जैन युवा रत्न पुरस्काराने दोघांना सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. ईश्वरलाल ललवाणी, आ. सुरेश भोळे, नयनतारा बाफना, द्वारका जालान, माजी महापौर प्रदीप रायसोनी, गोसेवक अजय ललवाणी, सुवर्ण व्यापारी सुशील बाफना उपस्थित होते. याप्रसंगी मावळते सचिव डॉ. राहुल भन्साली यांनी मागील वर्षभराच्या कामकाजाचा आढावा मांडला.
पदग्रहण सोहळ्यात उपजिल्हाधिकारी नीलम भरत बाफना व जलतरणपटू राजश्री आकाश कटारिया यांना जैन युवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानंतर नूतन अध्यक्ष रितेश छोरिया, नूतन सचिव ऋषभ शाह, कोषाध्यक्ष पंकज सुराणा तसेच संचालक मंडळाच्या सदस्यांचा शपथविधी पार पडला. पुणे येथुन आलेले मुख्य वक्ता द्वारका जालान यांनी मार्गदर्शन केले. दीपा देढिया यांनी सूत्रसंचालन केले. ऋषभ शहा यांनी आभार मानले.
यशस्वितेसाठी अनीश चांदिवाल, सचिन राका, प्रवीण पगारिया, मनोज लोढा, दर्शन टाटिया, चंद्रशेखर राका, रिकेशकुमार गांधी, जयेश ललवाणी, राहुल बांठिया, प्रणव मेहता,सौरभ कोठारी, विनय गांधी, अंकित जैन, जिनेश सोगटी, आनंद चांदिवाल,अथांग पारख, पियूष संघवी, अनिल सिसोदिया, जयेश ललवाणी, दिनेश राका, अमित कोठारी, शैलेश गांधी, दिनेश बाफना,अमोल श्रीश्रीमाल, मनीष लूनिया, पारस कुचेरिया, योगेश सांखला, अमोल फूलफगर, पूर्वेश शाह, संदीप सुराणा,यतिन राका, सुशील छाजेड, तेजस जैन, गौरव पंगारिया, आशीष कांकरिया, शैलेश कटारिया, धिरज पारख, सचिन बोरा, रोहित कोचर, कुशल गांधी, भावेश जैन, रितेश छाजेड, विनोद भंडारी, नमित जैन, पी आर ओ प्रविण छाजेड़ आदींनी परिश्रम घेतले