---Advertisement---
भुसावळ तालुक्यातील कठोरा खुर्द येथे ग्राम सचिवालयाचे लोकार्पण व जाहीर नागरिक सत्कार कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती…
रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळ तालुक्यातील कठोरे खुर्द येथे ग्रामदेवत जोगेश्वरी माता ग्राम सचिवालयाचे लोकार्पण तसेच आयपीएस अधिकारी कांतीलाल सुभाष पाटील यांचा जाहीर नागरिक सत्कार सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री, भारत सरकार मा. ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भूषविले. तर महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री संजय सावकारे व ह.भ.प. गुरुवर्य भरत महाराज (श्री क्षेत्र कुंडलपूर वेडोळे संस्थान) या कार्यक्रमाचे मुख्य मान्यवर म्हणून उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मा. ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी ग्रामस्तरावरील प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी ग्राम सचिवालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सांगितले. तसेच केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार समन्वयाने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
---Advertisement---
या ग्राम सचिवालयाचे लोकार्पण व जाहीर नागरिक सत्कार कार्यक्रमास सौ. रजनी सावकारे, सरपंच सौ. रोहिणी प्रशांत पाटील, उपसरपंच सौ. मनीषा उमाकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









